अंबाजोगाई – अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक या दोघांना लाच घेताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना ही कारवाई झाली.
शेतीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि तातडीने जामीन करण्यासाठी तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि पोलीस नाईक नितीन चौरे या दोघांनी तडजोडीने 15 हजार ररुपये घेण्याचे मान्य केले.
ही लाच घेताना चौरे आणि सेंगर या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.