April 1, 2023

तुलसी च्या विद्यार्थ्यांचे फॅशन स्पर्धेत यश !

तुलसी च्या विद्यार्थ्यांचे फॅशन स्पर्धेत यश !

बीड -फॅशनच्या दुनियेतील झगमगता सितारा बनण्यासाठी टिकलिंग फेदर आयोजित व बॉर्न ऑफ ब्युटी प्रस्तुत, ग्लॅम इंडिया – फॅशन आइडल स्पर्धे मध्ये देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल आणि तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनिंग मधील विद्यार्थिनींनी विजयी पताका फडकवली आहे.

पुणे येथे दि.२५ एप्रिल रोजी अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात ग्लॅम इंडिया फॅशन आइडल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून ऑडिशन मधून जवळपास 125 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत तुलसी इंग्लिश स्कूलच्या धनश्री शरद गोदाम (किड्स सिनियर गट) आणि भूमी विजय राऊळ (टीन्स गट) तसेच तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग बीएससी फॅशन डिझायनिंग प्रथम वर्गाच्या विशाखा साळवे (मिस गट), वर्षा शरद गोदाम (मिसेस गट)यांनी पारितोषिके प्राप्त केले आहे. तर धनश्री शरद गोदाम( बेस्ट किड्स वॉक सबटायटल अवॉर्ड), भूमी विजय राऊळ( बेस्ट टीन्स फॅशन आयकन सबटायटल अवॉर्ड),विशाखा साळवे(बेस्ट मिस कॉन्फिडन्ट सबटायटल अवॉर्ड),वर्षा शरद गोदाम(मिसेस सेकंड रनरअप अवॉर्ड) प्राप्त केले आहे.

तसेच तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन कॉलेज मधील (एम.डिझाईन)विद्यार्थिनी रंजना जोगदंड हिने एका विद्यार्थ्यांनी साठी तयार केलेल्या स्काय ब्ल्यू फॅब्रिक ड्रेस पॅटर्नला (बेस्ट आऊट फिट ड्रेस अवॉर्ड) मिळाला आहे.या यशाबद्दल देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप रोडे यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर,तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाइनच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी सहशिक्षक सिद्धार्थ अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले होते.या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click