May 26, 2022

सामाजिक न्याय विभागांतर्गत महामंडळासाठी वाढीव निधी !

सामाजिक न्याय विभागांतर्गत महामंडळासाठी वाढीव निधी !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असल्याचे गुरुवारी दिसून आले.त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या चार महामंडळाच्या निधीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 कोटींवरून 1000 कोटी करण्यात आली आहे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी 73.21 कोटी कोटी, ती देखील वाढवून 1000 कोटी करण्यात आली; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटींवरून 500 कोटी करण्यात आली आहे.

या चारही महामंडळांचे भागभांडवल मोठ्या प्रमाणात वाढवल्याने अनुसूचित जातीतील घटकांसह या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कैशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

या चारही महामंडळाचे भागभांडवल वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click