माजलगाव – बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री गुटख्याची तस्करी करणारा ट्रक पकडला.तब्बल 39 लाखाचा माल यावेळी जप्त केला.
कर्नाटक राज्यातील संगारेड्डी या गावातून KA 56 5413 हा ट्रक गुटखा घेऊन जालना कडे निघाला असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यांनी तातडीने पथकाला रवाना केले.माजलगाव ग्रामीण च्या पोलिसांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी पातरुड या ठिकाणी हा ट्रक अडवला.
या ट्रक मध्ये गोवा गुटख्याचे तब्बल 31 पोते ज्याची किंमत तब्बल 33 लाख 24 हजार रुपये होती ते आढळून आले.पोलिसांनी 33 लाखाचा गुटखा आणि 6 लाखाचा ट्रक असा 39 लाखाचा माल जप्त केला.
गेल्या वर्षभरात पंकज कुमावत यांच्या पथकाने जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर देखील कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे,मात्र तरीही गुटख्याची तस्करी थांबलेली नाही हे विशेष.