अंबाजोगाई – ट्रक आणि क्रूझर चा भीषण अपघात होऊन आठ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना अंबाजोगाई नजीक घडली.या अपघातात सात महिला मृत्युमुखी पडल्या आहेत.
शहराजवळील सायगाव येथे खडी केंद्राजवळ भरधाव ट्रक व जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जण जागीच ठार झाले तर अन्य काही जखमी आहेत.
लातूर जिल्ह्यातील आर्वी येथून जीपमधून (एमएच २४ व्ही- ८०६१) घरगुती कार्यक्रमासाठी एक कुटुंब अंबजोगाई तालुक्यातील राडी येथे जात होते. सायगावजवळ भरधाव ट्रकने (आरजे ११ जीए-९२१० ) जीपला समोरासमोर धडक दिली. यात आठ जण जागीच गतप्राण झाले. मृतांमध्ये सात महिला व एक बालकाचा समावेश आहे.
दरम्यान, आणखी काही जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातात जीपचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.