बीड – जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे वादग्रस्त ठरलेले बीडचे एसपी आर राजा यांची अखेर बदली झाली आहे.पुणे येथे उपायुक्त म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
बीडचे आ संदिप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांच्यासह आ विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्यांच्या जागी नवीन एसपी कोण येणार याबाबत चर्चा सुरू होती.दरम्यान आर राजा यांची पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.