December 10, 2022

कलेक्शन करणाऱ्याला सांभाळा अन वाळूतून तेल गाळा !

कलेक्शन करणाऱ्याला सांभाळा अन वाळूतून तेल गाळा !

बीड- प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या म्हणीप्रमाणे गेवराई तालुक्यातील पोलीस उपाधीक्षकापासून ते कलेक्शन करणाऱ्या शिपायापर्यंत प्रत्येक जण काम करत असल्याचे चित्र आहे.तलवाड्याचे नवगिरे असोत की चकलांबा येथील नवले अथवा राठोड सगळ्यांच्या कलेक्शन वाल्यांशी वाळू माफियांचा थेट देवाण घेवणीचा व्यवहार असल्याने कोणीच कारवाई करत नसल्याचे दिसत आहे.

गेवराई तालुक्यात तब्बल 70 किलोमीटर चा गोदाकाठ अन 50 किलोमीटर चा सिंदफणा नदीचा काठ आहे.त्यामुळे या तालुक्यात पोस्टिंग मिळावी म्हणून महसूल असो की पोलीस विभाग यामध्ये लाखोंची बोली लागते.त्यातल्या त्यात तलवाडा आणि चकलांबा पोलीस ठाणे मिळावे म्हणून किमान पंचवीस लाख रुपये मोजावे लागतात अशी चर्चा आहे.(sand mafiya )

सध्या या दोन्ही ठाण्यात जे प्रमुख आहेत त्या नवगिरे आणि नवले या दोघांनी राजा च्या दरबारात उंची वस्त्र अन मौल्यवान वस्तू भेट देऊन तसेच कॅश च्या माध्यमातून आपल्या पदरात हे ठाणे पाडून घेतले आहेत.गेल्या वर्षभरात या दोन्ही ठाणे प्रमुखांनी वाळू माफियांविरोधात किती कारवाई केल्या यावरूनच त्यांची कार्यशैली लक्षात येते.( Home department )

या तालुक्यात काम करायचे तर विद्यमान भाजप आमदार,दोन माजी आमदार यांची मर्जी राखावी लागते.त्यांच्या कार्यकर्त्यांना ऍडजस्ट केले की मग तुम्ही कितीही आणि काहीही खायला मोकळे.बर तालुक्यातील गोदकाठच्या माध्यमातून मिळणाऱ्या वाळूसाठी केवळ गेवराईच नाही तर बीड,परळी येथील प्रमुख प्रमुख लोकही इंटरेस्ट दाखवतात.

तलवाड्याचे कलेक्शन गायकवाड आणि खंडागळे हे करतात तर चकलांबा पोलीस ठाण्यातील शिपाई तीपाले हा राठोड यांच्यासाठी कलेक्शन करतो.या तीन जणांना सांभाळले की मग वाळू माफिया कोणालाच मोजीत नाहीत.नवगिरे,नवले आणि राठोड यांच्या जीवावर दररोज किमान दोनशे ते तीनशे गाड्या वाळू तस्करी केली जाते.महिन्याकाठी किमान चार ते पाच कोटींचे कलेक्शन महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना मिळते.

ज्या वाळूतून कोट्यवधी रुपये महिन्याला मिळतात त्या वाळू तस्करी वर कारवाई कशी करणार हा देखील प्रश्नच आहे.विशेष म्हणजे हे सगळं वरिष्ठांना देखील माहीत आहे मात्र त्यांना त्यांचा वाटा दिलेला असल्याने वाळू तस्करी जोमात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click