बीड- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ योगेश क्षीरसागर यांचा जामीन बीडच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या पितापुत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
जमिनीच्या वादातून दिड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालया नजीक दोन गटात गोळीबार झाला होता.या प्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता.
क्षीरसागर पिता पुत्रांना बीडच्या न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला होता.त्याची मुदत संपल्यावर त्यांनी बीडच्या न्यायालयात अंतरिम जामीन साठी अर्ज केला होता.मात्र सोमवारी न्यायालयाने तो फेटाळून लावला.
त्यानंतर क्षीरसागर पिता पुत्रांनी मंगळवारी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला,परंतु तो देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या दोघांपुढील अडचणी वाढल्या आहेत.