April 1, 2023

राठोड साहेब ,जरा अवैध वाळू उपश्याकडे लक्ष द्या !

राठोड साहेब ,जरा अवैध वाळू उपश्याकडे लक्ष द्या !

बीड – शेतकऱ्याच्या शेतात गांजाची वीस पंचवीस झाड सापडली म्हणून सिंघम कारवाईचा आव आणणाऱ्या उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांना गेवराई तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा दिसत नाही का अशी चर्चा होऊ लागली आहे.तलवाडा आणि चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला वाळू उपसा राठोड ,नवगिरे यांच्या आशीर्वादाने बिनदिक्कत सुरू आहे.त्याला आळा कोण घालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने थेट आमदार महोदयांनी विधानसभेत आवाज उठवला.जिल्ह्यात वाळू,गुटखा,मटका,क्लब जोमात सुरू आहेत.विशेषतः गेवराई तालुक्यातील गीदावरी पट्यात दररोज किमान दोनशे ते तीनशे गाड्या भरून वाळू उपसा केला जातो.

तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापूर,तपेनिमगाव,गंगावाडी यासह सात ते आठ ठिकाणी अवैध वाळू उपसा केला जातो.हा वाळू उपसा गावकरी,स्थानिक आणि तालुक्याचे पुढारी मिळून करतात.हा सगळा व्यवहार तलवाडा ठाण्याचे प्रमुख नवगिरे यांना माहीत आहे.अन त्यांनाच काय पण पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांना देखील माहीत आहे.मात्र हे दोघेही गेल्या काही महिन्यात एखाद्या कारवाईसाठी स्वतः रस्त्यावर उतरल्याचे कोणीच पाहिलेले नाही.

तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळू असो की मटका,गुटखा,क्लब व इतर अवैध धंदे या सगळ्याचे कलेक्शन करण्यासाठी नवगिरे यांनी खंडागळे आणि गायकवाड हे दोन पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत.वाळू सह इतर धंदेवाईक लोकांकडून हे दोघे कलेक्शन करून आपलं ,एपीआय आणि डीवायएसपी यांचं पोट भरतात अशी चर्चा आहे.

गोदावरी पट्यात जो काही वाळू उपसा केला जातो तो तलवाडा आणि चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जास्त होतो.त्यामुळे या ठिकाणी पोस्टिंग मिळण्यासाठी किमान वीस ते पंचवीस लाख रुपये मोजावे लागतात.हे पैसे मोजल्यावर ठाणे प्रमुखाने काय करायचं हे त्याचं त्याने ठरवायचं हा पोलीस दलातील अलिखित नियम आहे.

लाखो रुपये मोजून आलेल्या नवगिरे यांच्यासारख्या लोकांनी वाळू चे रेट देखील वाढवून ठेवले आहेत.एका ट्रॅक्टर ला महिन्याला पंधरा हजार,हायवा 25 ते 30 हजार आणि वाळू उपसा करणारी केणी यासाठी महिन्याला किमान पन्नास हजार रुपये घेतले जातात.यातील 70 टक्के एपीआय,20 टक्के डीवायएसपी, अडिशनल एसपी आणि एसपी तर दहा टक्याचे मालक हे कलेक्शन करणारे कर्मचारी असतात.

ज्या राठोड यांनी शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या गांजाची झाडे जप्त केली त्यांनी कधीतरी गोदावरी पट्यात जाऊन वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मात्र नवगिरे सारखे लोक जोपर्यंत हाताखाली आहेत तोपर्यंत राठोड काही करतील ही अपेक्षा चुकच आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click