May 26, 2022

गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला !

गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला !

बीड – गोवंश तस्करी आणि कत्तल यावर बंदी असताना देखील अकरा गायी आणि आठ वासरांची तस्करी करणाऱ्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडले.यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एका व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, आयशर टेम्पो क्रमांक एम एच 12 एचडी 0 421 मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या आपल्या स्वतःची फायदा करिता नेकनूर येथून अकरा गाई आठ वासरे टेम्पोमध्ये भरून कत्तल करण्यासाठी बीड येथे घेऊन जात आहे .

त्यानंतर कुमावत यांनी सदर टेम्पो बीड नेकनुर ते बीड जाणारे रोडवर नेकनूर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे 14 00 वाजता टेम्पो थांबवून टेम्पो चालकास नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख मज्जिद शेख राजा क रा मोमिनपुरा बीड असे सांगितले सदर टेम्पो ची पाहणी केली असता सदर टेम्पोमध्ये अकरा गाई व 8 वासरे मिळून आले सदर टेम्पो चालकास गाईचे व वासरांचे दाखल याबाबत विचारपूस केली असता जवळ नसल्याचे सांगून सदरची जनावरे ही मोमीन पुरा बीड येथील व्यापारी सोहील जलील कुरेशी यांच्या असून त्यांच्या सांगण्यावरून नेकनूर येथून टेम्पोमध्ये भरून बीड येथे घेऊन जात आहे असे सांगितले.

पोलिसांच्या कारवाईत दोन लाख रुपयांची जनावरे आणि चार लाख रुपयांचा टेम्पो असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click