December 10, 2022

स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!

स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!

परळी – स्वस्तात सोने खरेदी करणे परळीच्या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.मात्र पोलिसांच्या मेहनतीला वर्षभरानंतर यश आले अन गुजरातच्या बॉर्डर पासून दोन कुख्यात आरोपींना अटक केली.विशेष म्हणजे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अनेक दिवस वेष बदलून मेहनत घ्यावी लागली.

गेल्या वर्षापूर्वी एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्त दरात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. यावेळी व्यवहार करताना जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसुप कक्कळने शंकर शहाणे यांना ठरल्याप्रमाणे पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख घेऊन गेला.

४० लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसुप हा शंकर शहाणेंना सोने न देता टाळाटाळ करत राहिला. कोरोनाचा काळ आहे. आज, उद्या, सोने देतो म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसुप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे. हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी १ वर्षापूर्वी शहर पोलीस ठाण्यात जावून गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जिसुप कक्कळ आणि सिकंदर यांच्या मागावर होती. व्यवहार करताना जिसुप कक्कळने आपले नाव बदलून अब्बास आली असे नाव ठेवल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अनेक अडचणी येत होत्या. आरोपींच्या शोधात शहर पोलीस ठाण्याचे पथकाने मुंबई, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भोकरदन, सोलापूर आदी प्रमुख भागात शोध घेतला.

शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपी शोधण्याचा चंग बांधला आणि थेट मुंबई गाठली. त्याठिकाणी जंग जंग पछाडले एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचं मूळ नाव जीसूप कक्कळ असून तो पाकिस्तान बॉर्डर वरील भुज‌ कच्छ भागातील जंगला लगत राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलीस पथकाने रतियापासून पाकिस्तान बॉर्डर केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. आरोपीस पोलीस आहेत हे समजू नये म्हणून भास्कर केंद्रेंनी अक्षरशा एका मतीमंद व्यक्तीसारखे रूप धारण केले. आणि मदतीसाठी स्थानिकचे चार पोलिस कर्मचारी सोबत घेऊन आरोपीचे फॉर्म हाऊस गाठले. स्थानिक पोलिसांना आरोपीच्या बंगल्याच्या समोरचा दरवाजा वाजवण्यास सांगितले, अशात आरोपी मागच्या बाजूने जंगलात पळून जाणार म्हणून सहाय्यक पोलीस लपून बसले आणि आरोपी जिसूप कक्कळ हा मागच्या दाराने जंगलात पळून जात असतानाच भास्कर केंद्र यांनी आरोपीला जेरबंद केले . पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click