October 4, 2022

दोन चार हजार द्या अन टपरीवर दारू विका ! शिवाजीनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे अवैध धंदे वाढले !!

दोन चार हजार द्या अन टपरीवर दारू विका ! शिवाजीनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे अवैध धंदे वाढले !!

बीड- बीड शहर पोलीस ठाणे असो की शिवाजीनगर पोलीस ठाणे या दोन्ही ठिकाणी साहेबासाठी कलेक्शन करणाऱ्या परजने सारख्या लोकांमुळे अवैध धंदे बोकाळले आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दोन चार हजार रुपये द्या अन टपरीवर दारू बिनधास्तपणे विका असेच प्रकार सुरू आहेत. याकडे प्रभारी एसपी का डोळेझाक करत आहेत असा सवाल विचारला जात आहे.

बीड जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे हे विधानसभेत आमदार मंडळींनी मांडल्यानंतर पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली.एकीकडे केजचे पंकज कुमावत हे जिल्हाभरात अवैध धंद्या विरोधात कारवाई करत असताना स्थानिक पोलीस मात्र कलेक्शन मध्ये व्यस्त आहेत.

बीड शहर पोलीस ठाण्याप्रमाणेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अवैध धंदे जोरात आहेत.विशेषतः दारूविक्री जोरात आहे.बियरबार किंवा परमिट रूम चे लायसन नसताना हॊटेल च्या नावाखाली दारू विकली जात आहे.तसेच पान टपरी वरून देखील दारू विक्री केली जात आहे.

ज्या प्रमाणे बीड शहर ठाण्यात परजने हा कलेक्शन करतो त्याचप्रमाणे केतन राठोड यांचा मुन्शी असलेला दुसरा परजने हा शिवाजीनगर हद्दीत कलेक्शन करतो.शाहू नगर,शिवाजीनगर,नावगण कॉलेज,पंचशील नगर,बार्शी रोड,बालिपीर,अंबिका चौक,पालवन चौक,पोलीस ग्राउंड या सगळ्या भागात अक्षरशः पान टपरीवर दारू विक्री केली जात आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख केतन राठोड हे नेमकं करतात काय,अवैध धंदे सुरू असताना पोलीस लक्ष्मीदर्शन करण्यात कसकाय व्यस्त राहू शकतात असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click