January 30, 2023

पंधरा वर्षांपासून तिला घरातच ठेवलं होतं कोंडून !!

पंधरा वर्षांपासून तिला घरातच ठेवलं होतं कोंडून !!

बीड- गेल्या पंधरा वर्षांपासून तिने सूर्यदर्शन देखील घेतले नव्हते. ना कोणता सण उत्सव,ना कोणता समारंभ.ती घरातच कोंडून होती,कारण ती दिसायला सुंदर होती अन नवऱ्याला तिच्यावर संशय होता,त्यामुळे त्या हैवाणाने तिला कोंडून ठेवत तिच्यावर अत्याचार केले.जेव्हा तिची सुटका झाली त्यावेळी तिची अवस्था पाहून उपस्थित पोलीस अन सामाजिक कार्यकर्त्यांना देखील रडू कोसळले .

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षा पासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे महिलेला मारहाण देखील केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे दोन मुलं देखील दहशतीखाली आहेत. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली. विशेष म्हणजे या महिलेला अंत्यसंस्कार ला देखील जाण्यास नवऱ्याने नकार दिला.

बीड शहरातील रूपाली किन्हिकर असे या पिडीत महिलेचे नाव.बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज  किन्हिकर, या महिलेचां 20 वर्षांपूर्वी गडगंज श्रीमंत असलेल्या घरांमध्ये विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या दोन-तीन वर्ष आनंदात गेले. त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. एका दुकानावर कामाला जात होती, मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं. गेल्या 17 वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत, संशय घेतात पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते, त्यानंतर आज बाहेर निघाले आहे, माझी मुलं आहेत. मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील करत असल्याचं पीडित महिलेने सांगितले.

एवढेच नाही तर वडील मरण पावले.तर अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही.अशीच परिस्थिती या महिलेच्या मुलांवर पण आली आहे. याबाबत या महिलेचे शेजारी मुसा भाई यांनी सांगितले कि, हा व्यक्ती पोटच्या मुलांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास देत असून हा माणूस नाही हा हैवान आहे. याने जिवंत महिलेला कोंडून ठेवलं, हे आम्ही गेल्या 10 वर्षापासुन पाहतोय. खुप सुंदर असलेली महिला आज 80 वर्षाची दिसतेय.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click