अंबाजोगाई – धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी व्हावेत यासाठी केलेला नवस ग्रामस्थांनी मुंडे यांची पेढेतुला करून पूर्ण केला.यावेळी गावातील रामजन्म कार्यक्रमात ना मुंडे उत्साहाने सहभागी झाले.
अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे श्री शितलदास महाराज मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री राम नवमी च्या निमित्ताने आयोजित या उत्सवास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी प्रभू श्रीरामास वंदन करून श्री शितलदास महाराजांचेही दर्शन घेतले.
गिरवली आपेट व गिरवली वावणे या दोन्ही गावातील सरपंच व ग्रामस्थांनी धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत निवडून यावेत यासाठी साकडे घातले होते, आज त्याची पूर्तता करत सरपंच सौ. कडूबाई अण्णासाहेब आपेट, सौ. शारदा लक्ष्मणराव आपेट, बळवंत दत्तात्रय बावणे यांसह दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांची पेढेतुला करण्यात आली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ताराचंद शिंदे, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी भाऊ शिरसाठ, घाटनांदुर चे सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, सरपंच वसंतराव देशमुख, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, गोविंदराव देशमुख, पंचायत समिती सदस्य शिवहर भताने व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.