बीड- एकीकडे कोळशाच्या तुटवड्यामुळे घातलेली वीजनिर्मिती आणि त्यामुळे होणारे भारनियमन तर दुसरीकडे ज्या भागातील वसुली कमी तिथे केले जाणारे भारनियमन महावितरण ने सुरू केले आहे.मात्र काही बिल न भरणाऱ्या किंवा वीजचोरी करणाऱ्या लोकांमुळे रेग्युलर बिल भरणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.हा प्रकार म्हणजे गव्हा बरोबर किडे रगडण्याचा आहे असेच म्हणावे लागेल.
विजवीतरण कंपनी मार्फत बीड शहरासह जिल्ह्यातील काही भागात किमान साडेतीन तास अन कमाल आठ तास लोडशेडिंग केली जात आहे.उन्हाच्या तीव्रतेने धरणातील पाणीसाठा आटत चालला आहे.हे एक कारण वीजनिर्मिती घटण्याचे आहे तर दुसरीकडे कोळशाची टंचाई देखील असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे काही शहरात,जिल्ह्यात लोडशेडिंग सुरु झाली आहे.
40 ते 42 डिग्री चे तापमान आणि त्यात दिवसा आणि रात्री होणारे भारनियमन यामुळे लोकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.बीड शहरातील शहेनशहा नगर,मोमीनपुरा,माळीवेस,बलभीम चौक,शाहू नगर,बालेपीर अशा अनेक भागात रेग्युलर वीजबिल भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.तसेच न भरणारे देखील तेवढेच आहेत.
गेल्या तीन चार दिवसात महावितरण ने जे लोडशेडिंग सुरुकेले आहे त्यात सात विभाग (a,b,c,d,e,f,g,g1,g2,g3) असे निर्माण केले आहेत.यातील एबीसीडी या चार विभागात लोडशेडिंग नाहीये अन इतर ठिकाणी किमान साडेतीन तास ते आठ तास लोडशेडिंग सुरू आहे.
विजवसुली साठी महावितरण चे लोक ठराविक भागात जाण्यास घाबरतात,ठराविक लोकांकडे लाखो रुपये थकबाकी असली तरी वीज तोडली जात नाही,तर सामान्य माणसाकडे हजार दोन हजार बाकी असली तरी वीज तोडली जाते.काही ठराविक भागात वीजचोरी मोठ्या प्रमाणात आहे मात्र अधिकारी अन कर्मचारी त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतात.
जे लोक रेग्युलर वीजबिल भरतात त्यांना लोडशेडिंग चा त्रास का दिला जातो,ज्या भागात लोक बिल भरत नाहीत त्यांचे कनेक्शन कायम तोडून वीजचोरी वाचवणे गरजेचे आहे.मात्र विजवीतरण चे लोक गरिबाला दाबतात अन धटिंगण लोकांना भितात अशी अवस्था झाली आहे.