May 26, 2022

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !

बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे गाळप होईल ही शक्यता कमीच आहे.

राज्यात यंदाच्या हंगामात तब्बल 197 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला.31 मार्च अखेर 1162 लाख टन उसाचे गाळप झाले असून तब्बल 130 लाख टन ऊस अद्यापही शिल्लक आहे,त्यातील मराठवाड्यातील शिल्लक उसाचा आकडा हा 39 लाख टन एवढा मोठा आहे.आतापर्यंत राज्यात 1162 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.एकूणच राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील शिल्लक ऊस ही सरकार,कारखानदार आणि शेतकरी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

दरम्यान शिल्लक उसाबाबत राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या असून त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातल्या ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही त्रास सहन करावाच लागतो. मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, साखर सहसंचालक, खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक ऑनलाइन पार पडली. त्यात गाळपाविना अर्ध्यापर्यंत ऊस तसाच असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता ३१ मेपर्यंत गाळप झाले पाहिजे, अशा सूचना कारखानदारांना करण्यात आल्या आहेत.

शिवाय गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालवावे, ऊसतोडीसाठी माणसे नसतील तर शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घ्यावे आणि ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे महसूल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहेत. आता पावसाळ्यापूर्वीचे एप्रिल आणि मे असे दोन महिने उरलेले आहेत, त्यामुळे शेतात उभा असलेला ऊस कारखान्यात पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांची भर उन्हाळ्यात पळापळ दिसणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click