May 26, 2022

गजानन बँकेला अडीच कोटींचा नफा !

गजानन बँकेला अडीच कोटींचा नफा !

बीड- “सर्वांना आपलं मानणारी आपली बँक” या दृढ विश्वासाने १४५ कोटी व्यवसाय असलेल्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला मार्च २०२२ अखेर २ कोटी ६५ लाख १८ हजाराचा ढोबळ नफा झाला असुन करपुर्व नफा रू.१ कोटी ५६ लाख ९२ हजाराचा झाला आहे.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ.एम.एस. शेख यांनी दिली.

बँकेची मार्च २०२२ अखेर वित्तीय स्थिती मध्ये भाग भांडवल ३ कोटी ९६ लाख, राखीव व इतर निधी १४ कोटी २५ लाख, नेटवर्थ १४ कोटी ९८ लाख, ठेवी ८७ कोटी १६ लाख, कर्जे ५७ कोटी ६९ लाख, सी.डी. रेशो ६६.२० टक्के, ग्रॉस एनपीए २.३९ टक्के, नेट एनपीए शुन्य टक्के, २ कोटी ६५ लाख, भांडवल पर्याप्त रेशो २९.५८ टक्के खेळते भाग भांडवल १०७ कोटी ७२ लाख आहे. तसेच बँकेचा Average Borrowing Rate ५.४९ टक्के व Average Lending Rate १०.३४टक्के असुन वाढावा ४.८५ टक्के आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्व नॉर्मस् पुर्ण करीत आहे. बँकेच्या १)नवगण कॉलेज रोड शाखा, २)जुना मोंढा बीड शाखा, ३)पेठ बीड शाखा व ४) नेकनुर येथे शाखा, ५) रायमोह शाखा, ६) चौसाळा शाखा असुन ७) मुख्य शाखा,हाईटस् बीड येथे आहे. या सात शाखांना ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असून बँकेचे एकुण ग्राहक संख्या २२२६६ एवढी आहे. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा देत आहे.

सदर सेवेपासुन ग्राहक बँकेचे समाधान व्यक्त करीत आहे. बँकेचे कार्यक्षेत्र हे बीड जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते. परंतु आता मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बँकेचे बीड जिल्हा लगतचे जिल्हे कार्यक्षेत्र वाढीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याबाहेर लगतच्या जिल्हयात बँकेच्या शाखा उघडण्याचा मानस आहे. तसेच पुढील वर्षात बीड जिल्ह्यातील पिंपळनेर व शिरूर (कासार) व जिल्ह्यालगतचा जिल्हा औरंगाबाद येथे नवीन शाखा उघडण्याचा मानस आहे. या यशात बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, उपाध्यक्ष जगदीश काळे यांचे व सर्व संचालक मंडळाचे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर व बँकेचे सरव्यवस्थापक डॉ.एम.एस.शेख यांचे व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click