केज – सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारा लाभ आणि इतर रक्कमेबाबत तब्बल 12 लाख रुपयांची लाच मागून दीड लाख रुपये स्वीकारताना शाळेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि शिक्षकांना रंगेहाथ पकडल्याची घटना केजमध्ये घडली.
केज तालुक्यातील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक संक्षेचे सचिव अशोक चाटे, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत हंगे,सने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष उद्धव कराड आणि दत्तात्रय धस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार शिक्षक यांच्या सेवानिवृत्त झाल्यानंतर चा लाभ त्यांना मिळावा तसेच त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी आरोपींनी तब्बल बारा लाख रुपयांची मागणी केली.त्यातील दीड लाख रुपये स्वीकारताना या चौघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.