वडवणी – वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील बंधाऱ्या जवळ सेल्फी काढण्याच्या नादात तिघांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी घडली.मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.
वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील बंधाऱ्यावर तहा शेख,सिद्दीकी शेख आणि अन्य एक जण दोन मुलांना घेऊन फिरण्यास गेले होते.पाणी पाहिल्यानंतर या सर्वांना सेल्फी काढण्याचा मोह झाला.सेल्फी काढत असताना तोल गेल्याने हे पाचही जण बुडू लागले.यामध्ये दोन मुलांना बाहेर काढण्यात यश आले.
मात्र तहा शेख,सिद्दीकी शेख आणि अन्य एक जण पाण्यात बुडाले.या तिघांचा बुडून मृत्यू झाला.या तिघांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले.वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात या तिघांना मृत घोषित करण्यात आले.
अवघ्या चार महिन्यांपूर्वी यातील महिलेचा विवाह झाला होता,नवदाम्पत्य हे सासुरवाडी ला आले होते.यावेळी ही दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.