बीड – गुन्ह्यात मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेजस वाहूळे या पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.विशेष म्हणजे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस ठाण्यात नोकरीस असलेल्या तेजस वाहूळे या पोलीस कर्मचाऱ्याने गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.आडस येथे दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची तपासणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.ते एकीकडे तपासणी करत असताना दुसरीकडे पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.