बीड – देवेंद्र फडणवीस यांच्या सल्यानेच आपण शिवसेनेत गेलो अस सांगत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे टायगर आहेत अशी स्तुती केली.आलेल्या शिवसेना प्रवासाचा किस्सा सांगताना सत्तार यांनी आपण कायम सत्तेत असतो अस म्हणत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.कार्यक्रमाला आ संदिप क्षीरसागर, आ विनायक मेटे यांची उपस्थिती होती.
मी पुन्हा येईन असं म्हणनार नाही, कर्तबगार लोक निवडून येतातच, असं अब्दुल सत्तार म्हणाले. शिवसेनेत जाता जाता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र शिवसेनेत आलो. सत्तार नावातील र काढल्यास सत्ता होईल. कधी कधी राजकारणात मॅच फिक्सिंग करावी लागते, असं सत्तार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली,.
धनंजय मुंडे टायगर आहेत. निवडणूक हारून देखील ते टायगर राहिले. धनंजय मुंडे यांनी मला खूप मदत केली. घोडा कुठलाही असला तरी लगाम मुंडेंचीच असते, असंही सत्तार यांनी सांगितलं.