बीड- दोन वर्षापासून कोरोनामुळे होळी अन धुळवड साजरी न करण्यात अनेक निर्बंध आले होते.यंदा मात्र राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले असल्याने आता बिनधास्त बोंबला अन रंगात न्हाऊन जा .
राज्य सरकारने यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसतील अस परिपत्रक जारी केले आहे.यामध्ये कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.
-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी
-होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
-कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे