December 10, 2022

वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला !

वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला !

गेवराई – गोदावरी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्याविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला.ट्रॉली अंगावर घालत तीन ते चार कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. गोदावरी पात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा सुरू असताना तलवाडा,चकलांबा पोलीस मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.

बीड जिल्ह्यात अवैद्य वाळू उपसा करणारे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यांना कुणाचा धाक उरला नाही. बुधवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशा नुसार गेवराई तालुक्यातील खामगाव व सावरगाव येथुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातील अवैद्य वाळू उपशावर कारवाही करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या पथकातील पोलीस कर्मचारी बालाजी दराडे, राजू वंजारे, महादेव सातपुते, सचिन अहंकारे व विकास चोपने हे खाजगी वाहनाने केज येथून गेवराईकडे गेले होते. तेथे पोलीस पथक पोहोचतच शहागडकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचे पुर्व बाजुस नदी पात्रात जाऊन पोलीस पथकाने रात्री छापा मारला.

तेथे एक लाल रंगाचे विना नंबरचे ट्रॅक्टर व त्याला वाळू भरण्यासाठी समोर लावलेले खोऱ्याने एलपी ट्रक क्र. (एम एच-२३ /एआ र-८८२२) मध्ये वाळु भरत असतांना दिसले. त्यावेळी तेथे तीन इसम उभे होते. पोलीस गाडीच्या खाली उतरुन ट्रक व ट्रॅक्टर जवळ जात असताना; ट्रॅक्टरचे लोडरचे बाजुला उभे असलेल्या दोन इसमा पैकी अंगात पांढरे कपडे व दाढी असलेल्या इसमाने त्यांच्या जवळ उभे असलेल्या काळे कपडयातील इसमांनी ट्रॅक्टर लोडर वरील ड्रायव्हरला मोठयाने अवाज देऊन सांगीतले की, समोरुन येणारे लोकांचे अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मार. असे म्हणुन ओरडल्याने ट्रॅक्टर ड्रायव्हरने वाळू भरण्यासाठी असलेले लोडरचे खोरे पोलीसांना जिवे मारण्याचे उद्देशाने बालाजी दराडे व राजू वंजारे यांच्या अंगावर घालुन दोघांना खाली पाडले.

त्यावेळी त्यांच्या सोबतचे विकास चोपने, सचिन अहंकारे यांनी त्या दोघांना हाताला धरून बाजुला ओढले. त्यामुळे ते दोघे बचावले. त्या नंतर ट्रॅक्टर लोडर ड्रायव्हरने ट्रॅक्टर लोडर घेवुन नदी पात्राचे बाजुने कच्या रस्त्याने पळून गेला. तसेच इतर दोन इसम हे नदी पात्राने पळून गेले. त्यावेळी सोबतचे पोलीस यांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते मिळून आले नाहीत. घटनास्थळ वाळुने भरलेला ट्रक क्र. (एम एच-२३/ए आर- ८८२२) हा मिळुन आला. पंचा समक्ष सदर ट्रकचा कलम १०२ सीआरपीसी प्रमाणे सविस्तर जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click