August 16, 2022

वाळू उपश्याने ग्रामस्थ हैराण ! प्रशासनाचे दुर्लक्ष !

वाळू उपश्याने ग्रामस्थ हैराण ! प्रशासनाचे दुर्लक्ष !

गेवराई – तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे.यामुळे गंगावाडी,रिधोरी,राजापूर या सह गोदकाठ च्या गावातील ग्रामस्थांना भयंकर त्रास होत आहे,मात्र तहसील प्रशासन आणि पोलीस दोघेही या वाळू उपश्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत.तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी नेमकं काय करतात असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई,माजलगाव,परळी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे.या वाळूमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.तरीदेखील वाळू माफियांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

गेवराई तालुक्यातील राजापूर,रिधोरी,गंगावाडी,पांढरी,गोपत पिंपळगाव या ठिकाणाहून दररोज शेकडो गाड्या भरून वाळू उपसा केला जात आहे.यामुळे या गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ही वाहने जात असल्याने पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

या वाळू माफियांवर तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन मेहरबान असल्याने हा धंदा बिनधास्त सुरू आहे.गोदावरीच्या पात्रातील तलाठी,मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी यांना वाळू माफियाकडून हप्ते भेटत असल्याने कोणतीच कारवाई होत नाही.

तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस प्रमुख नवगिरे हे नावालाच असल्याची परिस्थिती आहे.जिल्हाधिकारी यांनी फिरती पथके तयार केली असली तरी पोलीस मात्र त्यांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे.वाळू माफियांमुळे गोदावरी पात्राचे वाटोळे होत आहे.मात्र त्याच्याशी ना महसूल ना पोलिसांना काही देणंघेणं आहे.या वाळू माफियावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click