बीड – शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदी अनिल जगताप यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.गेल्या चार महिन्यापासून हे पद रिक्त होते,यासाठी अनेकांनी ताकद लावली होती,अखेर जगताप यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.
शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
दरम्यान या पदासाठी अनिल जगताप यांच्यासह अनेक जणांनी मुंबईला जाऊन फिल्डिंग लावली होती.मात्र पक्षाने पुन्हा एकदा जगताप यांना संधी दिली आहे.तब्बल 13 वर्षापेक्षा अधिक काळ या पदावर राहिलेले जगताप आता पुन्हा जिल्हाप्रमुख झाल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.