November 26, 2022

अन मुंडेंनी जमिनीवर बसत जाणून घेतले दिव्यांगांचे प्रश्न !

अन मुंडेंनी जमिनीवर बसत जाणून घेतले दिव्यांगांचे प्रश्न !

बीड – बीड शहरात राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास आले असता गर्दीत मागे राहिलेल्या एका दिव्यांग जोडप्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी धनंजय मुंडे गर्दीतून मार्ग काढत तेथे गेले व अगदी जमिनीवर बसून त्या जोडप्याचे निवेदन स्वीकारले अन त्यांचा प्रश्न मार्गी लावला.

बीड शहरातील विशाल माने व त्यांच्या पत्नी हे दोघे दिव्यांग असून त्यांना दिव्यांगांसाठी उपयुक्त असलेली चारचाकी स्कुटी शासनाकडून मिळावी हे निवेदन माने दाम्पत्याने धनंजय मुंडे यांना दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करून त्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण किंवा शासनाच्या महाशरद या पोर्टलच्या माध्यमातून लवकरक स्कुटी मिळवून देण्यात येईल असे आश्वस्त केले.

बीड शहरात कृषी विभागाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांसाठी धनंजय मुंडे बीड येथे आले होते, त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांच्या पद्ग्रहण समारंभास देखील ते उपस्थित होते.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विविध तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्न, निवेदने ना. मुंडे यांच्या समोर मांडले.

शक्य त्या प्रकरणांचा जागच्या जागीच निपटारा करणे, संबंधितांना फोन वरून सूचना करत किंवा पत्राद्वारे जागच्या जागीच ते प्रश्न सोडवले जातात. उर्वरित दीर्घ कालीन कामांची निवेदने, पत्रव्यवहार, व्यक्तिगत व सामूहिक कामे, यांचा एकत्रित संचय करून त्यावर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयीन टिप्पणी किंवा पत्र जोडून संबंधित विभागास पाठवले जाते. धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात त्यांच्याकडे आलेला एकही कागद किंवा छोटीशी चिट्ठी सुद्धा निकाली काढली जाते, हे त्यांच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्य आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव राहणार

बीड शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची पाटी काढल्यामुळे काही शिवप्रेमींनी आज धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव राहील, असे आश्वासन धनंजय मुंडे यानी शिवप्रेमींना दिले तसेच यासाठी आवश्यक ती कागदोपत्री कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा प्रशासनास दिले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click