बीड- राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एवढ्यात होणे शक्य नसल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेवर सीईओ अजित पवार तर पंचायत समित्यांवर गटविकास अधिकारी हे प्रशासक असतील.याबाबत शासनाने आदेश काढले असून सोमवार पासून प्रशासक कारभार पाहतील.
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील नगर परिषद आणि महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एवढ्यात घेणे शक्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने याबाबत प्रभाग रचना करण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले आहेत.
नगर पालिकांच्या अध्यक्षांची मुदत संपल्याने त्यावर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर देखील सोमवार पासून प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासक पदी सीईओ अजित पवार यांची तर पंचायत समिती वर तेथील गटविकास अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.