December 10, 2022

पाटोदा येथील फौजदार अटकेत !

पाटोदा येथील फौजदार अटकेत !

बीड- गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल परत देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाटोदा येथील फौजदार आफरोज पठाण यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फौजदाराची पदोन्नती झाली होती. तो आनंद साजरा करत असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या आफरोज पठाण याच्याकडे ज्या गुन्ह्याचा तपास होता.त्यात चांगला अहवाल देण्यासाठी आणि गुन्ह्यातील मोबाईल सह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीने चाळीस हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. ही रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर पठाण यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.पठाण याची नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाली होती.

त्यानंतर दिवसभर त्याचा सत्कार,हार तुरे,पेढे वाटप सुरू होते,सायंकाळी लाच घेताना पकडण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click