बीड – कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या द्वारकदास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.आरबीआय ने कोणत्याही खातेदाराला बँकेतून पाच हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधने घातली आहेत.
बीडच्या द्वारकदास मंत्री बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे तसेच अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने बँक अडचणीत आली होती.बँकेवर सध्या प्रशासक असल्याने व्यवहारात नियमितपणा आणण्याचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 9 मार्च 2022 रोजी मंत्री बँकेवर काही बंधने घातली आहेत.यापुढे बँकेतील कोणत्याही खातेदाराला पाच हजरापेक्षा जास्त रक्कम एकाच वेळी काढता येणार नाहीये.पुढील सहा महिन्यासाठी ही बंधने असतील.तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज नव्याने देण्यास किंवा इतर कोणतेही अधिकार असणार नाहीत.
मंत्री बँकेमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर बँकेच्या अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.त्यातच आता आरबीआय ने आर्थिक निर्बंध घातल्याने अडचणी वाढल्या आहेत.