बीड – रजिस्ट्री कार्यालयात येऊन गोंधळ घालत दरोडा घातल्याचा आरोप असलेले रवींद्र क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.मागील महिन्यात दोन गटात गोळीबार होऊन दोन जण जखमी झाले होते.
बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.याच वादातून रजिस्ट्री कार्यालयात 25 फेब्रुवारी रोजी गोळीबाराची घटना घडली होती.डॉ भारतभूषण, डॉ योगेश यांच्यासह आठ जणांवर तर रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.
या प्रकरणात ऍड बाळासाहेब कोल्हे यांनी रवींद्र क्षीरसागर यांच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.त्यावर सुनावणी होऊन अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.