बीड – गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या तहसीलदार यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.यामध्ये बीडचे मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा मृत्यू झाला तर तहसीलदार डोके जखमी झाले.
बीड जिल्ह्यात वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला आहे.गेवराई, माजलगाव, परळी,आष्टी,शिरूर बीड या तालुक्यातील नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू बेकायदेशीर पणे उपसली जात आहे.
या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी बीडचे तहसीलदार सूर्यकांत डोके आणि मंडळ अधिकारी नितीन जाधव हे दोघे खाजगी वाहनाने निघाले होते.सावलेश्वर या ठिकाणी गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या खाली गेली.
या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा मृत्यू झाला तर डोके जखमी झाले.या अपघातानंतर जाधव यांच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.