बीड – बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सानप यांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट कुमावत यांच्या पथकाने उध्वस्त केले .मात्र यावेळी खरा मास्टर माईंड असलेला सचिन भोसले याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले की त्याला रेड करणाऱ्यांपैकी एखाद्या ओळखीच्याने सोडून दिले अशी चर्चा होत आहे.
बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा,मटका,हवाला,पत्ते, चकरी,क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणात चालतो.शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप यांच्यासाठी परजने आणि अन्य एक पोलीस कलेक्शन करतात.याबाबत सविस्तर न्यूज अँड व्युज ने छापले होते.
आम्ही बातम्या केल्यानंतर काही दिवसांनी पंकज कुमावत यांच्या पथकाने शहरातील तीन हवाला केंद्रावर छापा घातला.55 लाखाची रोकड जप्त करून तीन आरोपी ताब्यात घेतले.मात्र यावेळी सचिन भोसले याला सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे.
सचिन भोसले हा बीडमध्ये तीन हवाला केंद्र चालवतो,एवढेच नाही तर शहरातील पाच हवाला केंद्र चालकाकडून एलसीबी,पोलीस उपअधीक्षक आणि शहर पोलीस यांच्या हप्त्याचे कलेक्शन देखील हाच भोसले करतो.एलसीबी ला तीन ते पाच हजार,शहर पोलिसांना तीन ते पाच हजार गोळा करून देणारा हा भोसले स्वतः या कलेक्शनमध्ये महिन्याला किमान तीस ते चाळीस हजार रुपये प्लस राहतो.
या भोसलेचे अन शहर पोलीस,एलसीबी,एसपी ऑफिस मधील कलेक्शन करणाऱ्या परजने सारख्या पोलिसांचे घरोबयाचे संबध आहेत.त्यांची नावे काय आहेत अन त्यांना किती रुपये हप्ता दिला जातो हे आम्ही लवकरच सर्वांसमोर आणू.दरम्यान हा सचिन भोसले त्या दिवशीच्या कारवाईत सापडला होता.परंतु छापा घालण्यासाठी ज्या शिवाजी नगर च्या पोलिसांना कुमावत यांनी सांगितले होते,त्यातील एका जनाने भोसले वर कृपा केली अन त्याचे नाव काढून बोबडे चे नाव त्या ठिकाणी आले.
या सगळ्या प्रकारानंतर भोसले याचे अनेक किस्से समोर येत असून आम्ही ते निश्चितपणे समोर आणू.