बीड- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली हे आपल्यालाच उशिरा कळले असे सांगत ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण नॉट रीचेबल होतो असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली.त्यानंतर बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.तब्बल आठ दिवसांनी सोनवणे हे मिडियासमोर आले.
आपण चार साडेचार वर्षाच्या काळात लोकसभा निवडणूक लढलो,विधानसभेत चार आमदार निवडून आणले. जिल्हा परिषद ताब्यात घेतली. मात्र नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना आपण हजर नव्हतो आणि आपल्याला ही गोष्ट मिडियामधून समजली असे त्यांनी सांगितले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस वर नाराज नाहीत मात्र 2018 च्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्याला कोणी आयात केले अन तो पुन्हा भाजप वासी कसा झाला हे आपल्याला अद्याप कळलेले नाही तसेच 2014 च्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळी आपल्याला का संधी दिली गेली नाही हे सुद्धा आजपर्यंत मला समजलेले नाही असे त्यांनी म्हटले.