आष्टी – बीड अहमदनगर महामार्गावरील वाघळूज शिवारात साई भक्ती हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.यावेळी तब्बल 18 जुगारी अन अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दकडा ते अहमदनगर रस्त्यावर वाघलूज शिवारात हॉटेल साई भक्ती मध्ये अशोक एकनाथ खकाळ हा काही लोकांना एकत्र बसून जन्ना मन्ना पत्त्याच्या जुगारावर पैसे लावून जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळवीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांनी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रश्मीता राव व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस आमलदार यांना पंचा सह सदर ठिकाणी पाठविले.
त्यावेळी सदर ठिकाणी 18 इसम गोलाकार आकारात बसून जन्ना मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळताना जागीच मिळून मिळून आले. त्याचे ताब्यात नगदी 48430 रुपये व जुगाराचे साहित्य व 195000 रुपयांच्या चार मोटार सायकल , 9878 रुपयांचे देशी-विदेशी मद्य असा एकूण 253308 रुपयाचा ममुद्देमाल सापडला .