November 26, 2022

वकीलानेच केली फसवणूक !गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !!

वकीलानेच केली फसवणूक !गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश !!

बीड- शिरूर तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथील शेतकऱ्यांची जमीन ज्या उथळा प्रकल्पासाठी संपादित केली होती,त्याचा वाढीव मावेजा उचलल्यानंतर देखील वकिलाने कागदपत्रात खाडाखोड करीत दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावाने मावेजा साठी दावा दाखल केल्याचे उघड झाले.हा सगळा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी वकील आर एस चाळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.एखाद्या वकीलावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

शिरापूर धुमाळ येथील अण्णासाहेब उबाळे आणि इतर शेतकऱ्यांची जमीन उथळा प्रकल्पासाठी संपादित केली होती.ज्याच्या मोबदल्यात सुरवातीला 1 लाख 69 हजार रुपये मावेजा देण्यात आला.त्यानंतर 2016 मध्ये नव्या कायद्यानुसार दावा दाखल केला गेला आणि 8 लाख 13 हजाराचा मावेजा उचलण्यात आला.हा सगळा प्रकार झाल्यानंतर देखील वकील आर एस चाळक यांनी किसन उबाळे हे या जमिनीचे एकमेव मालक असल्याचे भासवून नव्याने दावा दाखल केला.

हा दावा लोकअदालत मध्ये तडजोडीने मिटवल्याचे सांगितले गेले परंतु लोक अदालतीचा निकाल उच्च न्यायालयाने रद्द करत प्रकरण दिवाणी न्यायालयात वर्ग केले.त्यावेळी या प्रकरणात वकील आर एस चाळक यांनी कागदपत्रात खाडाखोड केल्याचे समोर आले.तसेच मावेजा उचलल्याची माहिती दडवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

या सगळ्या प्रकरणात न्यायालयाची आणि शासनाची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बीडचे सह दिवाणी न्यायाधीश महेश फडे यांनी या प्रकरणी वकील आर एस चाळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधीक्षकांना दिले आहेत.

आर एस चाळक या वकील महाशयांनी शिरूर तालुक्यातील अनेक प्रकरणात अशाच पद्धतीने वाढीव मावेजा मिळवणे,खोटे शेतकरी दाखवून शासनाची फसवणूक करणे असे प्रकार केले आहेत.या मध्ये या वकील महाशयांना महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील मदत केल्याचे तसेच जायकवाडी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील मदत करत स्वतःचे उखळ पांढरे केल्याचे प्रकार घडले आहेत.

बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ च्या जमिनी लाटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.आता त्यात वकीलानेच न्यायालयाची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या वकिलाने अशा अनेक प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click