बीड- बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना कोण सल्ला देतात हे माहीत नाही मात्र त्यांचे सल्लागार फालतू आहेत अन त्यामुळेच त्यांचं ऐकून माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले यात आमदारांची इमेज डॅमेज होत आहे असं म्हणत डॉक्टर योगेश शिरसागर यांनी गोळीबार प्रकरण आणि त्या नंतरच्या घडामोडी यावर प्रकाश टाकला त्यासोबतच आम्ही एकाच छताखाली राहतो मात्र एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत असं सांगत त्यांनी लोकांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवली.
बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात 25 फेब्रुवारी रोजी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर डॉक्टर योगेश शिरसागर आणि नगराध्यक्ष भारत भूषण शिरसागर यांना न्यायालयाने पाच मार्च पर्यंत अंतरिम जामीन दिला त्यानंतर डॉक्टर क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत त्या दिवशी घडलेल्या प्रसंगावरून आपली भूमिका स्पष्ट केली.
घटना घडली त्या दिवशी मी आणि माझे वडील दोघेही बीडमध्ये नव्हतो त्या जमिनी वरून हा प्रकार झाला ती जमीन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावावर आहे तसेच खरेदी करणारे पवार हे देखील आमच्या परिवाराशी संबंधित आहेत जमिनीच्या व्यवहारात इतरांनी पडण्याची गरज नव्हती मात्र आमदाराच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले गेले.
या सगळ्या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर हे नेमका कोणाचा सल्ल्यावरून वागतात असा प्रश्न आम्हाला पडला असून त्यांच्या फालतू सल्लागार यामुळेच ते एक दिवस अडचणीत येतील असे सांगत डॉक्टर क्षीरसागर यांनी या प्रकरणात आम्ही त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे देखील तक्रार करणार आहोत आणि ते देखील निश्चितपणे आमदारांच्या या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतील असे त्यांनी स्पष्ट केले