बीड- बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार करणारा आरोपी माजी नगरसेवक सतीश पवार च्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची वाढ झाली आहे.न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
जमिनीच्या वादातून क्षीरसागर काका पुतण्या मधील वाद विकोपाला गेला.त्यातूनच रजिस्ट्री कार्यालयात गोळीबाराची घटना घडली.माजी नगरसेवक सतीश पवार याने केलेल्या गोळीबारात सतीश क्षीरसागर आणि फारोकी हे दोघे जखमी झाले.
या प्रकरणात दोघांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल झाले होते.दरम्यान मुख्य आरोपी सतीश पवार यास अटक केल्यानंतर 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.