बीड – बुलेटवर जाणाऱ्या तिघांना बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली.पाली नजीक असलेल्या नक्षत्र हॉटेल नजीक हा अपघात घडला.
पारस रोहिटे (वय 22),कृष्णा शेळके (23) आणि अक्षय मुळे हे तिघे मित्र आहेर वडगाव कडून बीडकडे येत होते.त्यावेळी समोरून येणाऱ्या एम एच 14 बिटी 2455 या बसने या तिघांच्या बुलेट ला धडक दिली.
हा अपघातात या तिघांपैकी दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.या अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली होती.