बीड- रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर ,डॉ योगेश क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असून पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.तर रवींद्र क्षीरसागर यांच्या जामीन अर्जावर देखील त्याच दिवशी सुनावणी होणार आहे.
बीडच्या क्षीरसागर काका पुतण्यातील वाद टोकाला पोहचला आहे.रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार करण्या पर्यंत हा वाद पोहचला.या प्रकरणात दोन्ही क्षीरसागरांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते.
दरम्यान या प्रकरणी बीडच्या न्यायालयात सुनावणी झाली.डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ योगेश क्षीरसागर यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.5मार्च रोजीपुढील सुनावणी होणार आहे. तर रवींद्र क्षीरसागर यांच्या जामीन अर्जावर शनिवारी म्हणजे 5 मार्च रोजीच सुनावणी होणार आहे.