November 26, 2022

गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ! तीन दिवसांची पोलीस कोठडी !!

गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ! तीन दिवसांची पोलीस कोठडी !!

बीड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश पवार याला पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे

शिरसागर काका-पुतण्या मधील राजकीय वाद संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे मात्र मागील आठवड्यात हा वाद मुद्द्यावरून थेट गुडघ्यावरील पोहोचला डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या नावावर असलेल्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यास रवींद्र क्षीरसागर हेमंत क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी विरोध दर्शवला होता

रजिस्ट्री कार्यालयात खरेदी-विक्रीसाठी जमलेल्या दोन गटात मारामारी झाल्यानंतर नगरसेवक सतीश पवार यांनी त्यांच्याकडील पिस्तूल मधून चार गोळ्या झाडल्या होत्या यामध्ये सतीश क्षीरसागर आणि फारुकी हे दोघे जण जखमी झाले होते

या घटनेनंतर सतीश पवार भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासह आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता दरम्यान मुख्य आरोपी सतीश पवार याच्या अटकेसाठी पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या नेतृत्वाखाली चार पथके राज्यात रवाना केली गेली होती

दरम्यान सोमवारी रात्री आरोपी सतीश पवार हा त्याच्या पेठ बीड भागातील घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा घालून आरोपी पवार यास अटक करण्यात आली त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click