December 10, 2022

हवाला रॅकेट उध्वस्त ! बीड शहरच्या नाकावर टिच्चून कारवाई !!

हवाला रॅकेट उध्वस्त ! बीड शहरच्या नाकावर टिच्चून कारवाई !!

बीड । वार्ताहर
शहरातील विविध भागात कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचा प्रकार बीडमध्ये उघड झाला आहे. कर चूकवून खुलेआमपणे नियमबाह्यपणे, अवैधरित्या ‘हवाला’ रॅकेट चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एक ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तीन ठिकाणाहून एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड जप्त केली. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने सोमवारी (दि.28) सायंकाळी ही कारवाई केली.

दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितांची बारकाईने चौकशी केली जात असून त्यांच्याकडून मोबाइल तसेच पैसे मोजण्याची मशीन जप्त करण्यात आली आहे.
बीडमध्ये विविध परिसरात बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

नंतर पथकातील अधिकारी,कर्मचार्‍यांनी बीड शहरात शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एक ठिकाणी छापा मारला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास या कारवाईला सुरु झाली होती.यात अंगडियामध्ये 35 लाख 79 हजार रुपये, आर.क्रांतीतून 9 लाख रुपये तसेच सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एक ठिकाणी 6 लाख 41 हजार रुपये अशी एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली.
याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना कसलाही हिशोब देता आला नाही. त्यामुळे हा प्रकार हवाला रॅकेटचा असल्याचे समोर आला. यावेळी मयू विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे या तीनही व्यवस्थापकांना चौकशीसाठी पोलीसांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आता हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे नेटवर्कही समोर येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडलेल्या तीनही संशयितांकडे कसून चौकशी सुरु असून चौकशीत सर्व बाबी निष्पन्न होतील. याबाबत पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असून ते पुढील कार्यवाही करणार आहेत. ही कारवाई शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर,पो.ना.विष्णू चव्हाण, रवी आघाव, संजय टुले, दीपक जावळे, अविनाश सानप, दिलीप गित्ते, राजू वंजारे, यांनी केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click