बीड- जिल्हा रुग्णालयात असलेल्या रक्तपेढी आणि इतर विभागात खरेदीच्या नावाखाली नंगानाच करणाऱ्या बांगर भावा बहिणीने रक्तपेढी विभागात अनागोंदी केली आहे.शेकडो रक्त पिशव्या एक्सपायरी झाल्याने फेकून देण्यात आल्या मात्र कागदोपत्री त्या वापरण्यात आल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केली गेली आहे.तपासणीसाठी आलेल्या समितीने या गोष्टीकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
जिल्हा रुग्णालयात असलेल्या रक्तपेढी विभागात गेल्या आठ दहा वर्षांपासून डॉ जयश्री बांगर आणि गणेश बांगर हे दोघे बहीण भाऊ कार्यरत आहेत.स्वतःच्याच मेडिकल मधून कागदोपत्री साहित्य खरेदी करायची.रक्तपेढी साठी लागणाऱ्या मशनरी,साहित्य खरेदी केलेले दाखवायचे.डीप फ्रिजर सारख्या मोठमोठ्या वस्तूची गरज नसताना खरेदी करायची असा गोंधळ या दोघांनी अनेक वर्षांपासून बिनबोभाट पणे घातलेला आहे.
रक्तपेढी मध्ये नोकरीला असलेले येवले असोत की गवते अथवा खेडकर सगळेच या दोघांच्या धाकात असल्याने ‘तेरी भी चूप अन मेरी भी चूप ‘अशी परिस्थिती आहे.
कोरोनाच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिर आयोजित केली,मात्र प्रति लाभार्थी दिले जाणारे वीस रुपये अनुदान या बांगर बहीण भावाने अन कर्मचाऱ्यांनी वाटून खाल्ले.एवढेच नाही तर रक्तदान केल्यानंतर चे कार्ड बोगस छापून ते गरजू रुग्णांना विक्री केल्याचे देखील प्रकार अनेकवेळा घडले आहेत.
कोरोनाच्या काळात रक्ताची गरज जास्त असताना बीड जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये शेकडो पिशव्या रक्त वापराविना खराब झाले.हे एक्सपयर झालेले रक्त बांगर मॅडम आणि कर्मचाऱ्यांनी फेकून दिले.परंतु आपल्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून कागदोपत्री हे रक्त रुग्णांसाठी वापरल्याचे दाखवले गेले.
या सगळ्या प्रकारची चौकशी करण्यासाठी लातूर उपसंचालक कार्यालयातून आलेल्या डॉ दुधाळ यांच्या पथकाने एक्सपायरी झालेले रक्त कसकाय वापरले,वापरले नसेल तर कागदोपत्री कसकाय दाखवले,ज्या रुग्णांच्या नावावर रक्त पिशव्या दिल्या गेल्या त्यांना खरोखरच त्याची गरज होती का,या सगळ्याची चौकशी डॉ दुधाळ यांच्या समितीने करणे आवश्यक आहे.
डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,तानाजी ठाकर, राजरतन जायभाये, नितीन चव्हाण यांच्यासारख्या लोकांनी जिल्हा रुग्णालयात जी लूट केली आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय इतर भ्रष्टाचार करणाऱ्यांना जरब बसणार नाही हे नक्की.चौकशी समिती आता काय तपासणी करते यावर सगळे अवलंबून आहे.