बीड- क्षीरसागर बंधूंमधील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला असून रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरीकडे न प उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी काका भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार केली आहे.क्षीरसागर परिवाराचा वाद आता चव्हाट्यावर आल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष कोणते रूप घेणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात शुक्रवारी गोळीबाराची घटना घडल्यानंतर राजकारण तापलं आहे.बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह इतरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी आ संदिप क्षीरसागर यांच्या वाडीलांसह दोन्ही भावावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.
प्रतिभा पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हेमंत क्षीरसागर यांनी आपल्या जीवाला काका भारतभूषण यांच्याकडून धोका असल्याची तक्रार केली.त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या तीन चार वर्षांपासून क्षीरसागर परिवारातील राजकीय वाद राज्याने पाहिला आहे.मात्र आता हा वाद मुद्यावरून गुद्यावर आल्याने बीडकर भयभीत झाले आहेत.या वादाचे पडसाद आगामी नगरपालिका निवडणुकीत पडतील अशी चिन्हे आहेत.