बीड- बीड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या जागेवर अंबाजोगाई तालुक्यातील राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर दोन जिवलग मित्रांची निवड झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील मूळ रहिवाशी असलेले राजेश्वर चव्हाण हे जेष्ठ नेते शरद पवार,अजित पवार आणि स्व विलासराव देशमुख यांच्या जवळचे म्हणून परिचित आहेत.
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू होती.बजरंग सोनवणे यांचे पद जाणार अशी चर्चा सुरू होती.माजी आ सुनील धांडे यांच्यासह अनेकांची नावे या स्पर्धेत होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली असली तरी अद्याप शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तिढा काही सुटलेला नाही.गेल्या दोन तीन महिन्यापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद रिक्त आहे.