बीड- जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात अजिनाथ मुंडे,तानाजी ठाकर आणि शेख रियाज या तीन स्टोर किपर नि आपले नातेवाईक, पाव्हने,मित्र मंडळी करोडपती करण्याची स्कीम सुरू केली.त्यांना त्या त्या काळच्या सीएस,एसीएस ने देखील मदत केली.त्या जीवावर सगळेच गब्बर झाले,मात्र आता या तिन्ही स्टोर किपर वर गुन्हे दाखल केल्याशिवाय यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर निघणार नाही हे नक्की .
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन अडीच वर्षात कोरोनाच्या काळात गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये, तानाजी ठाकर,शेख रियाज,एजाज या सगळ्या लोकांनी धुमाकूळ घातला.दोनशे ते तीनशे कोटी रुपयांच्या साहित्याची खरेदी केली गेली.
ही खरेदी करताना वरपासून ते खालपर्यंत सगळ्यांना त्यांचे त्यांचे हिस्से दिल्याने सगळेच चिडीचूप होते.अजिनाथ मुंडे याने जायभाये,गणेश बांगर यांच्या आदित्य एंटरप्राइज, तेजस एंटरप्राइज या संस्थांना नियम डावलून कोट्यवधींची कामे दिली.शेख रियाज याने सहारा एंटरप्राइज यासह इतर संस्थांना काम दिलो.
हे करताना ना टेंडर छापले,ना निविदा प्रक्रिया पार पाडली. उलटपक्षी दुसऱ्या कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी देखील होऊ दिले नाही.यातून मिळणारा वाटा तत्कालीन सीएस,एसीएस यांच्यासह राजकारणी मंडळींना देखील वाटलं गेला.त्यामुळे पुरवठा करणारे बांगर,जायभाये,रियाज सारखे लोक अद्यापही मोकाट आहेत.
ज्याप्रमाणे सीएस साबळे यांनी रक्तपेढी मधील कुटाने बाहेर काढण्यासाठी समिती नेमली आहे त्याच पद्धतीने स्टोर मधील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी देखील समिती नेमावी अशी मागणी होत आहे.