आष्टी – आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे गाय आणि बैलाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केला.यावेळी साडेसहा लाखाचे मांस आणि वाहने मिळून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एकूण अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दौलावडगाव येथील खलील कुरेशी आणि दलील कुरेशी हे दोघे डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना तयार करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.
यावेळी आयशर टेम्पो क्रमांक MH 23 W 3983 पाहणी केली असता टेम्पोत व शेडमध्ये 40 जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास पाच टन किमती 620000 टेम्पो किंमत 400000 व मुजरा साठी येणे जाण्यासाठी लागणारी टोयोटा कंपनीची ईटॉस कार क्रमांकMH 20 कस 8080 किमती 300000 असा एकूण 13 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आले.
या ठिकाणी पोलिसांनी साडेसहा लाखाचे गोमांस,एक टेम्पो,एक चारचाकी वाहन असा 13 लाखाचा माल जप्त केला.गुटखा,मटका,वाळू माफियांवर कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कुमावत यांच्या पथकाने आता ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.