बीड-जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी असो की शवविच्छेदन गृह सगळीकडे सर्वप्रकारच्या साहित्याचा पुरवठा करून कोरोना काळात मेलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या गणेश बांगर,डॉ जयश्री बांगर अन कंपनीच्या कारनाम्याची चौकशी सुरू झाली आहे.सीएस डॉ सुरेश साबळे यांनी या प्रकरणी त्रिस्तरीय समिती नियुक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षात गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये,रियाज,ठाकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचा पुरवठा केला.कागदोपत्री पुरवठा दाखवत या लोकांनी शासनाची फसवणूक केली.
त्याचसोबत जिल्हा रुग्णालयात असलेल्या रक्तपेढी मधील डॉ जयश्री बांगर,डॉ रेश्मा गवते ,डॉ गाल्फाडे, आर एस खेडकर,महादेव येवले,म्हात्रे,सोळंके यांनी मोठ्या प्रमाणात गैरकायदेशीर कामे केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक महिने त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
डॉ बांगर आणि त्यांचा भाऊ गणेश बांगर या दोघांनी जिल्हा रुग्णालयात अक्षरशः धुमाकूळ घातला.कोणत्याही टेंडर शिवाय कोट्यवधी रुपयांची खरेदी विक्री केली गेली.हे करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम केले गेले.
बांगर आणि अजिनाथ मुंडे, जायभाये यांनी कोरोनाच्या काळात साहित्य खरेदी,विक्री,पुरवठा यामध्ये भ्रष्टाचार केला.आता सीएस डॉ सुरेश साबळे यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.या समितीमध्ये डॉ आर बी देशपांडे, पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सदाशिव राऊत आणि रायमोह ग्रामीण रुग्णालयाचे डॉ संतोष शहाणे यांची नियुक्ती केली आहे.
या समितीने ब्लड बँकेत नोकरीस असलेल्या सर्व डॉक्टर, अधिकारी कर्मचारी यांना चौकशी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे आता लवकरच बांगर अँड कंपनीच्या काळ्या कारनाम्याची लक्तरे वेशीला टांगल्याशिवाय राहणार नाही असे दिसते आहे.