May 26, 2022

मस्जिदची जमीन बळकावली ! उपजिल्हाधिकारी शेळके सह इतरांवर गुन्हा !

मस्जिदची जमीन बळकावली ! उपजिल्हाधिकारी शेळके सह इतरांवर गुन्हा !

बीड- शहरातील पांगरी रोडवरील सारंगपूरा मस्जिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी सोमवारी (दि.21) बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह भूमाफिया आणि महसुलच्या कर्मचार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा वक्फ अधिकारी अमिनुज्जमा यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींमध्ये बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडूळे, उध्दव धपाटे, तत्कालीन मंडळ अधिकारी पी.के.राख आणि तलाठी तांदळे यांचा समावेश आहे.

बीड शहरातील सारंगपूरा मस्जिदीच्या नावे असलेल्या 25 एकर 38 गुंठे जमिनीला इनामदार रोशनअली यांनी 99 वर्षांची लिज केल्याचे दाखवत दिनकर गिराम यांच्या नावे फेरफार घेण्यात आला होता. सदर फेरफार रद्द करुन वक्फ बोर्डाला ताबा द्यावा अशी वक्फ बोर्डाने अनेकदा विनंती करुनदेखील ते फेरफार रद्द झाले नाहीत. उलट तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याने बेकायदेशीरपणे सदर जमिन खाजगी व्यक्तींच्या नावे खालसा केली. या प्रकरणात आता बडतर्फ करण्यात आलेला उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह इतर भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click