बीड – मागील दोन तीन महिन्यापासून शतक,द्विशतक,त्रिशतक गाठणाऱ्या कोरोनाने सोमवारी दिलासा दिला.सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.त्यामुळे बीड वासीयांनी यापुढे तरी अशाच पद्धतीने वागल्यास कोरोना निश्चितपणे हद्दपार होऊ शकतो .
बीड जिल्ह्यात गेल्या दोन तीन महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते.मागील वर्षी मे जून च्या काळात दुसऱ्या लाटेत कोरोनाने हजारोंचा टप्पा गाठला होता.शेकडो लोकांचे या काळात बळी गेले.त्यामुळे तिसरी लाट आल्यावर बीडकर काहीसे सतर्क झाले होते.
तिसऱ्या लाटेच्या सुरवातीला बीडमध्ये फारसे रुग्ण नव्हते.मात्र दिवाळीनंतर बीडमध्ये रुग्णवाढीचा वेग चांगलाच वाढीस लागला होता.गेल्या दोन महिन्यात शंभर पासून तीनशे पर्यंत रुग्ण वाढ झाल्याने चिंता वाटू लागली होती.काही दिवस बीडमध्ये सार्वजनिक कार्यक्रमावर देखील बंधने घालण्यात आली होती.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा आलेख उतरू लागला.अखेर शेवटच्या आठवड्यात हा आलेख शून्यावर आला आहे.सोमवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.असे असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.