January 30, 2023

खाडेंवारील गुन्हा मागे घ्या !महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

खाडेंवारील गुन्हा मागे घ्या !महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

बीड – शासकीय कर्तव्य बजावत असताना गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा आणि संबंधित पोलीस ठाणे प्रमुखाला निलंबित करावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी अन कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे हे वाळू माफियांवर कारवाई करत असल्याच्या रागातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.शासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करताना शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना फौजदारी संहिता 1973 मधील कलमान्वये संरक्षण आहे.मात्र तरीही गेवराईच्या ठाणे प्रमुखांनी गुन्हा दाखल केला आहे.

अशा पध्दतीने शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर खोटे गुन्हे दाखल झाले तर त्यांचे मनोधैर्य खचू शकते.त्यामुळे या प्रकरणात तातडीने गुन्हा रद्द करून पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click